Ad will apear here
Next
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खासगी व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या पाणी विक्षारण आणि १० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. यामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळणार आहे.

महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर स्वाक्षरी करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात पीपीपी तत्त्वावर १० मेगावॉट क्षमतेची सौर ऊर्जेची वीज निर्माण करणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा एकूण २१ ठिकाणी बसविण्यात येणार असून, या माध्यमातून १० मेगावॉट सौरऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर महापालिकेच्या ५६ शाळांच्या छतावरही ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. भविष्यात या यंत्रणेतून जवळपास १५३ मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेची गरज ५५ मेगावॉट असून, अतिरिक्त ऊर्जा नागरिकांना पुरविता येऊ शकते, अशा पद्धतीने या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा करार ठाणे महानगरपालिका आणि ठाणे सोलर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये करण्यात आला.

दरम्यान, खाडीच्या पाण्यावर प्रक्रिया करून राबविण्यात येणाऱ्या पाणी विक्षारण प्रकल्पाच्या करारावरही स्वाक्षरी करण्यात आली. फॉन्टस डिसालिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी हा करार करण्यात आला. या प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असून दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्णत: कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पांतर्गत २० दशलक्ष लिटर खाडीच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा प्रकल्प राबविणारी ठाणे महापालिका देशातील पहिली महापालिका आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZLMBE
Similar Posts
ठाणे पालिकेतर्फे दोन जुलैला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ठाणे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे उद्या, रविवारी, दोन जुलै रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.  
आरास स्पर्धेत जय बजरंग मित्र मंडळाला प्रथम पारितोषिक ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेमध्ये शांतीनगर, वागळे इस्टेट येथील जय बजरंग मित्र मंडळाने प्रथम पारितोषिक पटकाविले. खोपट येथील कोलबाड मित्र मंडळाने व्दितीय आणि पोलीस परेड मैदान, कोर्टनाका येथील पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तिसरा क्रमांक पटकाविला
ई-वाहनांच्या विविध पर्यायांवर ठाणे महापालिका आयुक्तांसमवेत तज्ज्ञांची बैठक ठाणे : शहरामध्ये राबविण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पांच्या विविध पर्यायांवर चार जुलै रोजी  महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त वाहतूक आयुक्त सहस्रबुद्धे, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक जलजारे, इलेक्ट्रिकल
ठाणे शहरात आरोग्य शिबिरे,औषध फवारणी ठाणे :   नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत तातडीने आरोग्य शिबिरे घेण्याचे आदेश  दिले. त्यानुसार आरोग्य विभागाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी जवळपास २२ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language